Top Menu

Custom Search

Tuesday, July 22, 2014

जोडीने रुतलेल्या पायांचे

जोडीने रुतलेल्या पायांचे
ठसे अजूनही तसेच आहेत

कधीची भिजली नाहीये ही जमीन
तू गेल्यापासून
इथली रानं ही तशीच आहेत

तू ये आणि बिलग
म्हणजे पाऊस पडेल आणि माती ओली होईल
अंकुर फुटायला लागतील आणि छाती ओली होईल.

No comments: