Skip to main content

मनातली शाळा पुन्हा एकदा लावा

प्रत्येकाच्या मनात खरच एक गोड शाळा लागलेली असते. फक्त इमारतच नव्हे तर तिथली मित्र, मनातल्या मनात मानलेल्या 'मैत्रिणी', आवडते शिक्षक, शिक्षिका वगैरे वगैरे ने आपली ही मनातली शाळा गच्च भरलेली असते. हाच संदेश शाळा हा चित्रपट देऊन जातो. अगदी प्रत्येक आठवण जागी करतो. चित्रपटाने सगळे बारकावे पकडले आहेत. त्यातली त्यात चिमुकल्यांची प्रेम कहाणी जिचा खरच खऱ्या आयुष्यात (म्हणजे वयाने मोठ्या झालेल्यांच्या भाषेत) फार काही सिग्नीफिकंस नसतो, ती तर इतकी छान चीत्रतीत केलेली आहेत की ज्यांना कधी शाळेतल्या चिमुकल्या प्रेमाची जाणीव झालेली नसेल त्यांना ही जाणवेल की अरे आपण तर त्या मनातल्या 'शिरोडकर' च्या प्रेमात होतो. मनातली शिरोडकर. व्वा. तुम्हाला त्या सगळ्या आठवणी जाग्या करायच्या असतील तर नक्की पहा आणि मनातली शाळा पुन्हा एकदा लावा.

Comments

Popular posts from this blog

ती अशीच त्याला भेटली, अगदी अचानक आलेल्या पावसासारखी

खूप पावसाळे गेले. पण अगदी अलीकडे पर्यंत त्याला पाऊस कधीच आवडलेला नव्हता. पाऊस म्हंटल की त्याला भीती वाटायची, नसती कट कट वाटायची. भिजणे तर त्याला कधीच नको वाटायचे, उगाच सर्दी ला आमंत्रण. पण मागच्या पवसाळ्यात ढग असे आले आणि पाऊस इतका पडला की तो पावसाच्या प्रेमातच पडला. पाऊस आधीही पडायचा, कदाचित असाच, इतकाच किंवा जास्त ही. पण या वेळेस मात्र पाऊस एकटा आला नाही, त्याच्या आयुष्यात सोबत घेऊन आला तिच्या केसांचा ओला सुगंध. ती अशीच त्याला भेटली, अगदी अचानक आलेल्या मुंबईतल्या पावसासारखी, चिंब भिजलेली. त्याला ती आवडली आणि म्हणून पाऊस ही. ती त्याला पुन्हा भेटली, न ठरवून, अशीच पुन्हा एकदा अचानक पावसाराखीच. ते बोलले, थांबले, विसावले. ती समोर आली तेंव्हा पाऊस नव्हताच, ती अजून थोडी जवळ आली तेंव्हा ही पाऊस नव्हता. तो तिच्याकडे सारखा पहातच होता, पण नजर चोरून. आयुष्यात पहिल्यांदा त्याने पावसाकडे येण्याची विनवणी केली. आशेच्या नजरेने त्याने ढगांकडे पाहिले. ढग होते, पण अजून पाऊस मात्र नव्हता. तरी ही आजूबाजूंच्या झाडात, डोंगरात, फुलात आणि पाखरात ओलावा होताच. त्याच्या विनवनीने अखेर तो आला. रिम-झिम, रिम-झिम...

Must watch marathi movies of the season

Zing chik zing Hapus http://www.youtube.com/watch?v=7_PERcVlVvY&feature=related दोन्ही चित्रपट अगदी खूप छान आहेत. दोन्ही वेग वेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतात. एक खूप हसवतो तर दुसरा हसवता-रडवतो-हसवता. जास्त बोलणे नव्हे, अप्रतिम कलाकृती पहायच्या असतील तर नक्की जाऊन या!