Top Menu

Custom Search

Tuesday, September 20, 2011

जागुनी रात्री साऱ्या तू अन मी काढल्या होत्या......

जागुनी रात्री साऱ्या तू अन मी काढल्या होत्या,
तोडून चांदण्या ही रात्रीत माळल्या होत्या.

अन चांदण्यांचा मग ढिगारा शाय्येत लागला होता
लाजुनी चंद्र नभीचा तेंव्हा गालात हासला होता.

बहरून रात्र राणी घरभर पसरली होती 
तोडून अंधाराला वीज चमकली होती.

मी बाहूत घायाळ झालो
तू अजुनी तहानलेली 

मी बेधुंद होवून बरसलो 
तू तृप्त पुन्हा जननी. 

No comments: