Top Menu

Custom Search

Friday, July 20, 2012

पांडुरंग सांगवीकर

नेमकाच संविकारचा निरोप घेतला. हो, तेच सांगवीकर. पांडुरंग सांगवीकर. जे पुण्यात शिकले आणि पुढे गावात वसले. हो. हो. अगदी तेच. यान ही आणि आमची ओळख तंतोतंत म्हणजे अगदीच तंतोतंत ७ वर्षां पूर्वी जवळ पास याच महिन्यात म्हणजे उदाहरणार्थ जून मध्ये अगदी बरोबर पुण्याच्या नव्हे तर औरंगाबादच्या हनुमान टेकडीच्या खाली झाली. टेकडीच्या अगदी पायथ्याशी. पुन्हा मग यांचे भाऊ मागे काही महिन्यान खाली भेटले खंडेराव. त्यांना भेटल्यावर पुन्हा पांडुरंग सांगवीकर ची आठवण झाली. भेट घेण्याची इच्छा होती. पण बघ थोडा निवांत झाल्यावर म्हणून प्रोग्राम लांबवला शेवटी. मागच्या थर्सडे ला उक्कलगावला जाता जाता म्याजेस्टिक गाठले. एकदाचे सांगवीकर भेटले पण पुन्हा तीन दिवस मुंबईला परत येईपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारता आल्या नाही. शेवटी आज संपलेल्या, हो हो म्हणजे १ तसा पूर्वी संपलेल्या विकडेज मध्ये त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारता आल्या. तसा या वेळेस संगाविकारांसोबत गप्पांचे विशेष प्रयोजन होते. कारण कळेलच काही दिवसात. असो. झोपा आता. म्हणजे आम्ही पहाटे झोपणार आहोतच. हे मात्र उदाहरणार्थ. शेवटी जागलेल्या झोपावे लागतेच आणि झोपनाराला कधी ना कधी उठावे लागतेच. पण प्रश्न नको की उठायचे असेल तर झोपायचे का? किंवा मग जागणे अनंत नसेल तर उठयचेच का? तर तसे शास्त्रातच लीव्हलय.

No comments: