Skip to main content

नौकरीच्या संधी !

नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या २ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदांची थेट मुलाखत २९ ऑक्टोबर २००९ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. ३ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात २० जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागामार्फत स्टोअर किपर (१० जागा), डेप्युटी रेंजर (३ जागा), स्टेनोग्राफर (४ जागा), स्टॅटेटिकल असिस्टंट (१ जागा), कंपनी प्रोसेक्युटर (१ जागा), ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २००९ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

संयुक्त संरक्षण सेवेत अधिकार्‍यांच्या ५१५ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०१० या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत भारतीय लष्करी प्रबोधिनी (२५० जागा), भारतीय नौदल अकादमी (४० जागा), हवाई दल अकादमी (३२ जागा), ऑफिसर ट्रेनिंग अकादमी (१७५ जागा), ऑफिसर ट्रेनिंग अकादमी-महिला (१८ जागा) येथील अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

स्टाफ सिलेक्शन मार्फत टॅक्स असिस्टंटच्या ९०४ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत टॅक्स असिस्टंट परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात टॅक्स असिस्टंट (९०४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज ३० ऑक्टोबर २००९ पर्यंत भरावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

राजस्थान पोस्टमास्तर जनरल कार्यालयात २९८ जागा
राजस्थान पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात पोस्टल असिस्टंट (२५९ जागा), सॉर्टिंग असिस्टंट (३९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १४ जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागातील शरीरविकृती शास्त्रज्ञ-पॅथॉलॉजिस्ट (२ जागा), सांख्यिकी अधिकारी (१ जागा), कृषि व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागातील उप दुग्धशाळा अभियंता (१ जागा), दुग्धव्यवसाय विभागातील प्रशासन गट (६ जागा), पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक (१ जागा फक्त अपंगांसाठी), कनिष्ठ भूवैज्ञानिक (३ जागा फक्त अपंगांसाठी राखीव) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २८ ऑक्टोबर २००९ पर्यंत सादर करावेत. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. ३० सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ३०० जागा

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी- ऑपरेशन (२५० जागा), मॅनेजमेंट ट्रेनी- फायनान्स (५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती www.bsnl.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

आयआयटी दिल्ली येथे १८ जागा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथे कुलसचिव (१ जागा), इन्स्टिट्यूट इंजिनिअर (१ जागा), इंडस्ट्रियल लायझन ऑफिसर (१ जागा), सहायक कुलसचिव (२ जागा), सहायक कार्यकारी अभियंता (१ जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (३ जागा), कनिष्ठ तांत्रिक अधिक्षक (३ जागा), कनिष्ठ अभियंता (५ जागा), स्वच्छता निरीक्षक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २० ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.iitd.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये १० जागा

पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये अभियंता (१ जागा), अधिकारी (३ जागा), कार्यालयीन सहायक (६ जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. अर्ज २३ ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती http://www.nccs.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अंधेरीच्या ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटलमध्ये ग्रंथपालाची १ जागा
मुंबईतील अंधेरी येथील ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटलमध्ये ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २००९ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीमध्ये दि. २८ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ३१३ जागा
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (३१३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २००९ पर्यंत भरावेत. अधिक माहिती बँकेच्या https://www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझममध्ये १ जागा
नवी मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम या संस्थेत असिस्टंट (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत पाठवावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९-२५ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये १३०३ जागा
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये अकाऊंट असिस्टंट (१८ जागा), कस्टमर रिलेशन असिस्टंट (३१८ जागा), मेंटेनर (९६१ जागा), स्टोअर असिस्टंट (३ जागा), फायर इन्स्पेक्टर (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १९ ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.delhimetrorail.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९-२५ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.

भारतीय नौसेनेत खेळाडूंची भरती
भारतीय नौसेनेत क्रीडा कोट्याअंतर्गत सेलर भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९-२५ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.

पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये १०९ जागा
पार्लमेंट ऑफ इंडिया, लोकसभा, राज्यसभा सचिवालयात रिसर्च असिस्टंट (७ जागा), ज्युनिअर पार्लमेंटरी रिपोर्टर-हिंदी/इंग्रजी (७ जागा), स्टेनोग्राफर (३४ जागा), भाषांतरकार (७ जागा), सिक्युरिटी असिस्टंट (५६ जागा)त, सिक्युरिटी असिस्टंट-तांत्रिक (३७ जागा), कनिष्ठ लिपिक (४२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षकाच्या ३० जागा
इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात निरीक्षक - हिंदी भाषांतरकार (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती http://itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडो तिबेट पोलीस दलात शिपाई पदाच्या २४५० जागा
इंडो तिबेट सीमा पोलीस दलात शिपाई-जनरल ड्युटी (२४५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील १५२ जागांचा समावेश आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोंबर २००९ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत दि. २४ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनमध्ये शास्त्रज्ञांच्या ८५ जागा
केंद्र शासनाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी संघटनमध्ये शास्त्रज्ञ - इलेक्ट्रिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (४५ जागा), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (२० जागा), रिमोट सेन्सिंग/जिओ इन्फॉर्मेटिक (७ जागा), मॅथॅमॉटिढुंझ्र् (१० जागा), सिव्हिल इंजिनिअरिंग (१ जागा), मेकॉनिकल इंजिनिअरिंग (१ जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोंबर २००९ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९-२५ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.

माझगाव डॉकमध्ये ६ जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक - तांत्रिक (४ जागा), सहायक व्यवस्थापक - सुरक्षा (१ जागा), फायर ऑफिसर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ ऑक्टोंबर २००९ पर्यंत करावेत. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लष्करी वैद्यकीय सेवेत महिलांसाठी २५० जागा
लष्करी वैद्यकीय सेवेच्या नर्सिंग सेवेत महिलांसाठी नर्सिंग ऑफिसर (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोंबर २००९ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.indianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९-२५ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.

इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षकाच्या ८६ जागा
इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षक - ओव्हरसियर (६१ जागा), सहायक पोलीस उपनिरीक्षक - स्टेनोग्राफर (२५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती http://itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडमध्ये १० जागा
हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडच्या बंगलोर येथील मॅनेजमेंट अकॅडमीत सिनिअर फॅकल्टी-बिझनेस डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग (१ जागा), फॅकल्टी- इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग/फायनान्स मॅनेजमेंट (२ जागा), असिस्टंट लायब्ररी ऑफिसर (१ जागा), असिस्टंट सिस्टिम ऍंडमिनिस्ट्रेटर (१ जागा) या कायम स्वरुपी पदांसोबतच कंत्राटी तत्त्वावरील सिनिअर फॅकल्टी (३ जागा), फॅकल्टी (१ जागा), व्यवस्थापक - इलेक्ट्रिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ९ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती http://www.hal-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये मागासवर्गीयांसाठी ७८ जागा
केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये मागासवर्गीयांसाठी पदव्युत्तर पदवी शिक्षक (९ जागा), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (२८ जागा), प्राथमिक शिक्षक (३१ जागा), चित्रकला शिक्षक (४ जागा), ग्रंथपाल (१ जागा), अनुभवी शिक्षक (१ जागा), संगीत शिक्षक (३ जागा), कनिष्ठ स्टेनोग्राफर (१ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (२६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १९ ऑक्टोंबर २००९ पर्यंत भरावेत. अधिक माहिती http://www.kvsangathan.nic.in/rec-scst-advt३.doc या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकाच्या ३ जागा
पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात सहाय्यक प्राध्यापक (३ जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ernet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीत दि. १९ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९१ जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील गृह विभागात सहायक सरकारी अभियोक्ता (८२ जागा), जलसंपदा विभागातील मृद सर्वेक्षण अधिकारी (२ जागा), उपमृद सर्वेक्षण अधिकारी (६ जागा), विधी व न्याय विभागातील ग्रंथपाल व संदर्भाधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २० ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. १९ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

गोवा लोकसेवा आयोगातर्फे १२ जागांची भरती
गोवा लोकसेवा आयोगातर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रोफेसर-रेडिओथेरपी (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर-रेडिओथेरपी (१ जागा), गोवा औषधनिर्माण महाविद्यालयातील प्राचार्य (१ जागा), प्रोफेसर (२ जागा), असिस्टंट प्रोफेसर (१ जागा), अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात संचालक (१ जागा), गोवा आर्क्टिक्टेक्चर महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर (१ जागा), गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रोफेसर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ६ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.goapsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. १६ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.


 अधिक जागांसाठी बघा :  http://www.jijau.com/naukari     (सौजन्य महान्यूज )

Comments

Popular posts from this blog

Publishing business basics

Basic Steps:
1. Decide name for the company
2. Register the company with ministry - you will need an attorney (Lawyer for that)
3. Register with Registrar of News Papers in India if it's a magazine/News paper. 
4. Study the relevant acts in general or get them known from the lawyer
5. Start publishing

Following are details regarding the same (not that well written) :

-----
Some starts and books;
* Start Your Own Self-Publishing Business (Entrepreneur Magazine's Start Up) by Entrepreneur Press 
* How To Start And Run A Small Book Publishing Company: A Small Business Guide To Self-Publishing And Independent Publishing by Peter I. Hupalo * Art & Science Of Book Publishing by Herbert S., Jr. Bailey * This Business of Books: A Complete Overview of the Industry from Concept Through Sales by Claudia Suzanne
Raja Rammohun Roy National Agency for ISBN
West Block-I, Wing-6, 2nd Floor,
Sector -I, R.K. Puram,
New Delhi-110066


Some new things and the initiatives in the area : Pothi.com

Starting it is …

काही सुंदर अशी मराठी गाणी

>Suhasya tuze manasi mohi
http://www.esnips.com/displayimage.php?pid=22969903

>Jenvha Tuzya batanna udawi mujor wara
http://www.esnips.com/displayimage.php?pid=22969806

>Bhay ithale sampat nahi
http://www.esnips.com/displayimage.php?pid=22969806

>Pahile na mi tula
http://www.esnips.com/displayimage.php?pid=22969877

>Te sparsha chandanyanche
http://www.esnips.com/displayimage.php?pid=2086815

Installing SyntaxNet on ubuntu - Deep learning - tensorflow

1. Install Java8 (Java7(deprecated)
2. Install Brazel:
$ echo "deb [arch=amd64] http://storage.googleapis.com/bazel-apt stable jdk1.8" | sudo tee /etc/apt/sources.list.d/bazel.list $ curl https://storage.googleapis.com/bazel-apt/doc/apt-key.pub.gpg | sudo apt-key add - sudo apt-get update && sudo apt-get install bazel 3. sudo apt-get install swig
4. sudo pip install -U protobuf==3.0.0b2 5. sudo pip install asciitree 6. sudo pip install numpy Then you must have git installed : sudo apt-get install git and then built and test

git clone --recursive https://github.com/tensorflow/models.git cd models/syntaxnet/tensorflow ./configure cd .. bazel test syntaxnet/... util/utf8/... # On Mac, run the following: bazel test --linkopt=-headerpad_max_install_names \ syntaxnet/... util/utf8/...