Top Menu

Custom Search

Wednesday, February 18, 2009

Shyam Bhau on Shiv jayanti ....!

महाराष्ट्रातल्या कोणत्या मास्सणवटेत जरी गेला आणि " छत्रपती शिवाजी महाराज की ... " आशी एक जोरदार आरोळी ठोकली तर तिथे पुरलेले मुडदे देखील " जय !!" म्हणून साद देतील , इतके प्रचंड उपकार शिवाजी महाराजानी मराठी माणसावर , या महाराष्ट्रावर केलेत. जिवंत माणसे तर सोडा पण दगड माती यात देखील शिवरायणी जीव घातला होता , म्हणून तर मुकी जनावर देखील तेव्हा " माझा महाराष्ट्र " आस स्वभमानाने मनात होती. पण आज त्याच महाराष्ट्राच काय झाल आहे ?

भाषेचा , राज्याचा आपल्या इतिहासाचा देखील आभिमान आज कोणात दिसत नाही. आम्ही " शांति - सर्वा धर्म समभाव " आड लपत आपले कर्तव्य टाळत आहेत. शांति - सर्वाधर्म समभाव याच्या नवा खाली आपला आभिमान विसरने , आपल्या संस्कृती वर होणारा परकीय घात पाहत थंड राहणे म्हणजे भ्याड पनच आहे. !!. हे आस चालू आहे म्हणूनच आजपावतो परमवीर, धर्मवीर संभाजी देखील वाईट रंगवला गेला आणि आम्ही मात्र शांत राहिलो. वयाच्या 16 वर्षी शंभू ने "बुधभूषण" सारखा राजकारण, युध नीती यावर संस्कृत ग्रंथ लिहाला हे कोणाला माहीत होते ? आज शंभू राजे आडकले , उद्या कोण आसेल सांगता येणार नाही.

आज कित्तेक शाळा , शासकीय कार्यालया मधे शिव जयंती साजरी होत नाही. (( ताज उदाहरण , एस. जी. जी. एस. नांदेड मधे मागच्या 5 वर्षा पासून चालू असलेला शिव- जन्मोस्तव या वर्षी रोखला जातोय. हे उदाहरण माझ्या लेखात नव्हते. )) ही कशाची सुरूवात म्हणायची ? आपण याला बंधन घालायला हवे की नाही ?

शिवरायंच्या या महाराष्ट्रात महाराष्ट्राच संपवायला आलेल्या ओरंगजेबाच नाव आम्ही एका शहराला दिल आणि आजही तेच बोम्बल्त फिरतो. फक्त एक " सामना " आणि काही शिव प्रेमी त्याला " संभाजीनगर" म्हणतात. आसो स्वाभिमान हा जन्म जात आसवा लागतो , बळच कोम्बता येत नाही. पण निदान मी तरी संभाजीनगरच म्हणणार .

शिव जयंती च्या तारखाचा दुसरा एक वाद. बहुदा ना सुटणारा. पण मला वाटते जे झाले ते झाले , दोन तर दोन. पण त्या दोन्ही दिवसी मराठी माणूस एक्जुटच आसवा. दोन्ही दिवसी जयंती उत्साहाताच होणार.

उद्या शिव जयंती माझ्या तालुक्यातल्या लोकल पेपर मधून "राख व्हायची वेळ आली , आता तरी स्वाभिमाणाचे निखारे पेटू द्या !!!" या लेखातून मी काही विचार मांडले , त्यातलाच हा काही भाग. पण एक सत्य निदान आता तरी मराठी माणसाने जाग व्हायलाच पाहिजे !!!

शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा !!


- श्याम वाढेकर

No comments: