Skip to main content

Posts

Showing posts from January, 2008

गिरीश वाघ...congrates..!

ही कार हे माझं स्वप्न होतंचं. पण ते साकार करण्यासाठी गेली चार वर्षे तरुण इंजिनिअर्सची टीम खपत होती. या कारचं श्रेय जातं ते गिरीशला आणि त्याच्या टीमला... असं रतन टाटा यांनी कारच्या लाँचिंगच्यावेळी जाहीर केले. एवढंच नव्हे तर त्यांनी मराठमोळ्या गिरीशला चक्क स्टेजवर बोलावून घेऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गिरीश वाघ... टाटा मोटर्सचा एक्का म्हणूनच ते ओळखले जातात. टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटमध्येही तसा खास उल्लेख आहे. इतरांसारखाच दिसणारा गिरीश अगदी साधा माणूस. फक्त वेगळ्या पद्धतीने विचार करणारा. म्हणूनच टाटा मोटर्सने आपले सगळ्यात मोठे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्या हाती सोपवली. पुण्याच्या ४०० एकर भूखंडावर पसरलेल्या कंपनीच्या कारखान्यात सुमारे साडेतीन हजार इंजिनिअर काम करतात. त्यातील कार डिझाइन विभागाचे मॅनेजर गिरीश वाघ. ३४ वर्षीय गिरीश आणि त्यांच्या सहका-यांनीच लाखमोलाच्या नॅनोचे डिझाईन तयार केलंय. एक लाखाची गाडी तयार करायची पण त्यात भारतीयांसाठी जास्तीत जास्त आरामदायी सेवा द्यायच्या हे एक फार मोठे आव्हान होते. त्यामुळे पारंपरिकता सोडून , आर्थिकदृष्ट्या व्यवहारी नसलेला विच