Skip to main content

Posts

Showing posts with the label athavan

प्रत्येक क्षणाचा पिक्झेल न पिक्झेल

कितीही नको म्हंटले तरी आठवणी पुन्हा समोर येतातच. डोक्यात चाललेलं सगळ बाहेर काढून पुन्हा आपला प्रस्थ आत अस काही मांडतात की आठवणींची आणि डोक्यातल्या जागेची इंटरसेक्शन घेतली तरी ती त्या दोघांच्याही युनियन इतकीच भरते आणि ते होवून ही अजून मन सुद्धा गच्च भरलेले असते. आजही तसेच झाले. अगदीच अचानक, त्याला आज तिची आठवण झाली. मागे पुढे काहीच संदर्भ नसतांना. दिवसभर बड-बड करून थकलेला तो सायंकाळी अचानकच शांत झाला. लोकांच्या गर्दीतून दूर जाऊन बसला, विचार करत. जोरात निश्वास सोडत. पुन्हा विचार करत. अस खूप वेळ चालू होत. चेहरा अगदीच मलूल. कुणी बघितल तर, रडेल हा अचानक, असच म्हणेल. त्याच्या डोळ्या समोरून ती सगळी सरकत होती अगदी चित्रपटाच्या फिल्म सारखी एका एका क्षणाने. ती हसतांना. ती रुसतांना. ती लाडात आलेली असतांना. सगळे हाव-भाव तिचे अगदी स्पष्ट आणि मोठ्या रेसोल्युशन मध्ये समोर येत होते. तो अगदी विसरलाच होता तिला. पण मग हे काय अचानक? कारण एखादा माणूस कुणाला अगदीच विसरला असेल तर आठवून आठवून ही त्या व्यक्तीचा चेहरा त्याला निट आठवत नसतो. पण मग इथे तर अगदी डोळ्यासमोर प्रत्येक क्षणाचा पिक्झेल न पिक्झेल स्पष्ट ...