स्टार माझा ने केलेल्या या कौतुकाबद्दल त्यांचे मनापासून आभार, राजकीय आणि सामाजिक संस्कारात वाढलेले आम्ही, लहानपणी नेहमी वाटायचा कि समाजासमोर उभ्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे / समस्येचे उत्तर हे "मुख्यमंत्री" देऊ शकतात.. पण जसा मोठा होत गेलो .. तसा मुख्यमंत्री आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यातील अंतर जाणवायला लागले.. मग ठरवले या दोघांना एकत्र आणायचा.. मनात आलेला प्रत्येक प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करायचा.. मग यातूनच "मुख्यमंत्री-कार्यकर्ता" ची निर्मिती झाली. मग मनात असलेले असंख्य प्रश्न मग ते सामाजिक असो, राजकीय असो किंवा ऐतिहासिक यांना एक मुक्त व्यासपीठ मिळाले.. मुख्यमंत्री कार्यकर्ता ब्लॉग.. इंटरनेट वरील स्वातंत्र्याचा आधार घेऊन आपले विचार कुठे तरी जतन करावे आणि ते लोकांपर्यंत पोचवावे या साठी मग मी आणि माझे सहकारी प्रकाश पिंपळे यांची सुरु झाली धडपड. आपल्याच लिखाणातून आपल्यावर कसे संस्कार होऊ शकतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे मी आणि प्रकाश. संस्कार या साठी म्हणाल कि कारण पुढे याच संस्कारातून जिजाऊ.काम ची संकल्पना उदयास आली. सामान्य माणसाच्या विचाराची कुठे तरी दा