खूप अंतर चालून आल्यावर मागचे सगळेच भुरकट दिसते. तेच आयुष्याचे. जशी वेळ निघून जाईल आणि वय वाढत जाईल तशाच आठवणी ही भुरकट होतात. आठवणीच नव्हे तर आयुष्यातील जुन्या लोकांचे, मित्रांचे, ‘मैत्रिणींचे’, शिक्षकांचे चेहरेही भुरकट होतात. अंधुक होतात. आणि तीच गोष्ट आयुष्याला जवळुन स्पर्श केलेल्या वस्तूंची, वासांची आणि सवयींचीही. लहान असतांना सकाळी उठून अभ्यास करने, सकाळच्या ट्युशनला हिवाळ्यात कुडकुडत्या थंडीत कुडकुडत जाने. तो स्वेटर, आपला काळा आणि 'ति'चा गुलाबी. पुढे आलेली दोघांची सायकल. रस्त्याने रोज भेटणारी तीच माणसे. अशा अनेक गोष्टी खूप भुर्कट होतात. भुरकटच होत जातात.
त्या आपण विसरतो म्हणा की एका कप्प्यात बांधून ठेवतो म्हणा; पण त्या कधी कधीच आठवतात. आयुष्यातून यातल्या बऱ्याच गोष्टींची फारकत होते. पण कुठे त्या दिसल्या की मग मात्र हळूच मन किती ही गर्दीत असल तरी मागे जातं. धूसरचका होईना पण सगळ आठवायचा प्रयत्न करतं. कधी कधी काही चेहरी आणि घटना पूर्ण आठवतच नाही. पाहिलं प्रपोज केल ‘त्या’ वेळी ‘ती’ नेमकी घरून शाळेत जात होती की शाळेतून घरी येत होती? नक्की आठवत नाही. पण मग थोड लॉजिक लावल की आठवत, अरे दुपार होती आणि आपण ९ वीत होतो, शाळा सकाळची असायची. हो, म्हणजे ‘शाळेतून येतच असावी!’ या अशा गोष्टी घडायला लागतात. त्या सरांचा किंवा बाईंचा चेहराच निट आठवत नाही. मग चिंताच लागते इतके दूर आलोत का आपण? आणि मग ‘ही’ आवाज देते आणि बऱ्याच धुसर गोष्टी धूसरच राहतात. कारण पुन्हा कोण जाने हे सगळ कधी आठवेल या सगळ्या धावपळीत, असं वाटायला लागतं.
सुखाच्या शोधात आपण नवीन गोष्टी पाहत, विकत घेत, आपल्याशा करत प्रवास करत असतो. शोध पुढे-पुढे चालूच असतो. कधी कधी शोध संपला असं क्षणासाठी वाटत. पण बऱ्याच वेळेस पुन्हा तीच पायपीट, नवं काहीतरी शोधायला. बऱ्याच वेळेस कंटाळा येतो या चालण्याचा, प्रत्येक वेळी 'या वेळेस सापडले' अस वाटून भ्रमनिरस होण्याचा. तेंव्हा मग माणूस मागे वळून पाहतो. फडताळातल्या जुन्या वस्तू शोधतो. जुन्या वाह्यांपासून ते जुन्या घड्याळा पर्यंत एक एक वस्तू हातात घेतांना शोध मागे जाऊन संपतो, पुढे नव्हे; हे कळते. पण मागे खुप काही सोडून ठेवणीतल्या वस्तूंची संख्या वाढवायची असल्यास तितकच पुढेही याव लागत हे मात्र खरं. म्हणून, चलते रहो! - प्रकाश बा. पिंपळे

Comments