Skip to main content

Posts

Showing posts from January, 2015

भुरकट

खूप अंतर चालून आल्यावर मागचे सगळेच भुरकट दिसते. तेच आयुष्याचे. जशी वेळ निघून जाईल आणि वय वाढत जाईल तशाच आठवणी ही भुरकट होतात. आठवणीच नव्हे तर आयुष्यातील जुन्या लोकांचे, मित्रांचे, ‘मैत्रिणींचे’, शिक्षकांचे चेहरेही भुरकट होतात. अंधुक होतात. आणि तीच गोष्ट आयुष्याला जवळुन स्पर्श केलेल्या वस्तूंची, वासांची आणि सवयींचीही. लहान असतांना सकाळी उठून अभ्यास करने, सकाळच्या ट्युशनला हिवाळ्यात कुडकुडत्या थंडीत कुडकुडत जाने. तो स्वेटर, आपला काळा आणि 'ति'चा गुलाबी. पुढे आलेली दोघांची सायकल. रस्त्याने रोज भेटणारी तीच माणसे. अशा अनेक गोष्टी खूप भुर्कट होतात. भुरकटच होत जातात. त्या आपण विसरतो म्हणा की एका कप्प्यात बांधून ठेवतो म्हणा; पण त्या कधी कधीच आठवतात. आयुष्यातून यातल्या बऱ्याच गोष्टींची फारकत होते. पण कुठे त्या दिसल्या की मग मात्र हळूच मन किती ही गर्दीत असल तरी मागे जातं. धूसरचका होईना पण सगळ आठवायचा प्रयत्न करतं. कधी कधी काही चेहरी आणि घटना पूर्ण आठवतच नाही. पाहिलं प्रपोज केल ‘त्या’ वेळी ‘ती’ नेमकी घरून शाळेत जात होती की शाळेतून घरी येत होती? नक्की आठवत नाही. पण मग थोड लॉजिक लावल की आ...