तुला चंद्र फार आवडायचा
नभात एकटाच बसलेला
मला चंद्र फार आवडायचा
गालातल्या गालात हसलेला
---
तू बाहेर पहायचीस
पडणारा पाऊस
माझ मन त्याला सांगायच
पड अजून थोडा आत्ताच नको जाऊस
---
मी फक्त चहा घ्यायचो
तू आईसक्रीम खायचीस
खरं सांगू आज तुला
बिलाची तेंव्हा अगदीच पंचाईत व्हयाची
---
मी गुलाबाची फुलं अनायचो
तू डब्ब्या मधे पोहे
सारून गेली वर्षे तरीही
'चव' लक्षात आहे
---
कविता तर मी लहानपणापासूनच करायचो
त्यांना लय मात्र आली तू आल्यावरच.
---
पारिजातकाचा सडा आजकाल रोज दारात पडतो
वेचून घ्यायला नाहीस तू
म्हणून बिचारा रडतो
---
तू हसायचीस तेंव्हा ही
तू रुसायचीस तेंव्हा ही
मिठी हाच उपाय असायचा
नेमका त्याच क्षणी जाऊन
ओठ ओठांवरती बसायचा
- प्र. बा.
सारून गेली वर्षे तरीही
'चव' लक्षात आहे
---
कविता तर मी लहानपणापासूनच करायचो
त्यांना लय मात्र आली तू आल्यावरच.
---
पारिजातकाचा सडा आजकाल रोज दारात पडतो
वेचून घ्यायला नाहीस तू
म्हणून बिचारा रडतो
---
तू हसायचीस तेंव्हा ही
तू रुसायचीस तेंव्हा ही
मिठी हाच उपाय असायचा
नेमका त्याच क्षणी जाऊन
ओठ ओठांवरती बसायचा
- प्र. बा.
Comments