Skip to main content

Posts

Showing posts from March, 2014

तुला चंद्र फार आवडायचा ….

तुला चंद्र फार आवडायचा नभात एकटाच बसलेला मला चंद्र फार आवडायचा गालातल्या गालात हसलेला   --- तू बाहेर पहायचीस  पडणारा पाऊस  माझ मन त्याला सांगायच  पड अजून थोडा आत्ताच नको जाऊस --- मी फक्त  चहा घ्यायचो  तू आईसक्रीम खायचीस  खरं सांगू आज तुला बिलाची तेंव्हा अगदीच पंचाईत व्हयाची --- मी गुलाबाची फुलं अनायचो  तू डब्ब्या मधे पोहे सारून गेली वर्षे तरीही 'चव'  लक्षात आहे --- कविता तर मी लहानपणापासूनच करायचो त्यांना लय  मात्र आली तू आल्यावरच. --- पारिजातकाचा सडा आजकाल रोज दारात पडतो वेचून घ्यायला नाहीस तू म्हणून बिचारा रडतो --- तू हसायचीस तेंव्हा ही तू  रुसायचीस तेंव्हा ही मिठी हाच उपाय असायचा नेमका त्याच क्षणी जाऊन ओठ ओठांवरती बसायचा                            - प्र. बा.