स्टार माझा ने केलेल्या या कौतुकाबद्दल त्यांचे मनापासून आभार,
राजकीय आणि सामाजिक संस्कारात वाढलेले आम्ही, लहानपणी नेहमी वाटायचा कि समाजासमोर उभ्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे / समस्येचे उत्तर हे "मुख्यमंत्री" देऊ शकतात.. पण जसा मोठा होत गेलो .. तसा मुख्यमंत्री आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यातील अंतर जाणवायला लागले.. मग ठरवले या दोघांना एकत्र आणायचा.. मनात आलेला प्रत्येक प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करायचा.. मग यातूनच "मुख्यमंत्री-कार्यकर्ता" ची निर्मिती झाली. मग मनात असलेले असंख्य प्रश्न मग ते सामाजिक असो, राजकीय असो किंवा ऐतिहासिक यांना एक मुक्त व्यासपीठ मिळाले.. मुख्यमंत्री कार्यकर्ता ब्लॉग.. इंटरनेट वरील स्वातंत्र्याचा आधार घेऊन आपले विचार कुठे तरी जतन करावे आणि ते लोकांपर्यंत पोचवावे या साठी मग मी आणि माझे सहकारी प्रकाश पिंपळे यांची सुरु झाली धडपड.
आपल्याच लिखाणातून आपल्यावर कसे संस्कार होऊ शकतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे मी आणि प्रकाश. संस्कार या साठी म्हणाल कि कारण पुढे याच संस्कारातून जिजाऊ.काम ची संकल्पना उदयास आली. सामान्य माणसाच्या विचाराची कुठे तरी दाखल घेतली जाते याचा हि अनुभव आला. स्टार माझा च्या ब्लॉग माझा या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आणि आपण करीत असलेल्या कार्याची पावतीच मिळाल्या सारखे वाटले.
हि कौतुकाची थाप नक्कीच आम्हाला एक नवे प्रोत्साहन देईल कारण आमचा असा ठाम विश्वास आहे कि ज्या प्रमाणे मागची पिढी हि वर्तमानपत्रे किंवा मासिक वाचून घडली.. त्याच प्रमाणे सध्याची पिढी किंवा येणारी पिढी हि वेब वरील ब्लॉग/ फोरम वाचून घडणार. आपण उद्या असू किंवा नसू.. पण आपले विचार हे जिवंत असले पाहिजेत.. पुढच्या पिढीला हि विचार करायला लावणारे लिखाण मुख्यमंत्री - कार्याकार्ताच्या माध्यमातून सतत चालू ठेवू असा विश्वास आम्हाला आहे.
तमाम वाचकांचे शतश: आभार .. आपल्या प्रतिक्रिया / मत नेहमीच कळवत राहा ..
जय हिंद .. जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे व प्रकाश पिंपळे
(व जिजाऊ.काम कार्यकर्ते )
Comments