Top Menu

Custom Search

Thursday, November 14, 2013

पाहून तुला तिची मला आठवण येते

0 comments
त्याला तिच्या सारखी एक मुलगी दिसते. तिच्याकडे तो पाहताच राहतो. ती थोडी भांबावते. तो तिला या काही ओळींनी या सगळ्याच कारण सांगतो

नको असं - तसं काही  वाटून तू घेऊ
चेहऱ्यात तुझ्या तिचे गाल मऊ मऊ

डोळे जसे तुझे हसती हसायची ती ही
हसत हसत पाहून तिला फसायचो मी ही

डोळ्या मध्ये मला तुझ्या पाहूदेना थोडे
हळू हळू मग मी हे सोडवेल कोडे

पाहून तुला तिची मला आठवण येते
डोळ्यामध्ये  मग ती तरळून जाते

भेटलीच तुला तर आवर्जून सांग
कधी कधी फुटतो माझ्या डोळ्यांचा ही बांध

जमलेच तुला तर भेटतजा कधी
सुकलेल्या मनाला झुळूक ही साधी

                                                 - प्र. बा.